You are currently viewing कुडाळ शहरात 8 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

कुडाळ शहरात 8 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

सिंधुदुर्गनगरी : 

कुडाळ शहरात आदर्शपार्क, मंगलमुर्ती, घर नं. 2745 दिनांक 28 सप्टेंबर 2020 पर्यंत, इंद्रप्रस्थनगर, घर नं. 2468, लक्ष्मीवाडी, मोरया रेसिडेन्सी, ए विंग प्लॅट नं. 22 दिनांक 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत, अनंत मुक्ताई हॉटेल, नंदनवन पार्क, बंगलो नं. 2, दिनांक 3 ऑक्टोबर 2020 पर्यंत,  इंद्रप्रस्थनगर, घर क्र. 3698, लक्ष्मीवाडी, सिंधुरत्न कॉम्प्लेक्स, बी विंग डी-5, खालची कुंभारवाडी घर नं. 3993 दिनांक 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत,परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट संबंधित दिनांकपर्यंत  रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eight =