You are currently viewing उद्या डॉ. चंद्रकांत सावंत यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण

उद्या डॉ. चंद्रकांत सावंत यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण

सावंतवाडी :

 

पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या २५ वर्षात समाज हितासाठी लाखो रुपये खर्च करून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दूरदर्शनने दखल घेत आपल्या सह्याद्री वाहिनीवरील ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी त्यांची निवड केली होती.

ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा मठ प्राथमिक शाळा नं. २ चे पदवीधर शिक्षक असलेल्या डॉ चंद्रकांत सावंत यांची गेल्या १० जानेवारी रोजी या कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली होती. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून या मुलाखतीचे रविवारी २६ फेब्रुवारीला सायंकाळी ७:३० वाजता आणि रात्री १० वाजता तसेच सोमवारी २७ फेब्रुवारीला दुपारी १: ३० वाजता प्रक्षेपण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा