You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दोडामार्ग सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख श्री दिपक जाधव यांनी दोडामार्ग तालुक्यात भव्य स्वरूपाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारून मिळावे यासाठी श्री. पाटील यांना पत्राद्वारे अर्ज केला.

या पत्रामध्ये श्री. जाधव असे म्हणाले की ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्गाच्या वतीने विनंती करतो की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात समाज मंदिर किंवा भवन आहे. आमच्या दोडामार्ग तालुक्यात अशा प्रकारची वास्तु नाही तर महोदयांस समाजाची राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशी मागणी आहे की दोडामार्ग येथे भव्य स्वरूपाचे भारतरत्न संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व्हावे अशी मागणी तमाम जनतेच्या वतीने केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा