You are currently viewing पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करणार

पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करणार

श्री मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गनगरी :

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी पदावर नियुक्त झालेले श्री मकरंद देशमुख यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्री अविनाश सामंत पर्यटन महासंघ मालवण तालुका अध्यक्ष ,श्री जितेंद्र पंडित पर्यटन व्यावसायिक महासंघ सावंतवाडी तालुका अध्यक्ष तसेच श्री विजय गोंदवळे पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महासंघ करीत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली जिल्हापरिषदेच्या सहकार्याने जिल्हातील 431 ग्रामपंचायती मध्ये शाश्वत पर्यटन विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपर्यटन समिती गठीत झाल्या असून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यटन योजना राबविण्याचे काम महासंघ करीत असून केंद्र सरकार च्या माध्यमातून शालेय विद्याथ्यांना पर्यटन क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी युवा पर्यटन क्लब स्थापन करत असून यासाठी समन्वयक म्हणून पर्यटन महासंघा निवड झाली असून टुरिझम क्लब निर्मिती साठी महासंघ काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने देण्यात आली तसेच स्वदेश दर्शन च्या माध्यमातुन चालत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली .जिल्ह्यात सागरी पर्यटन बरोबर ऍग्री,कल्चर,वन ,हिस्ट्री,साहसी क्रीडा,मेडिकल टुरिझम,कातळशिल्प क्षेत्रात पर्यटन व्यवसाय विस्ताराची गरज असून या क्षेत्रात आपल्या मदतीची आवश्यक्यता आहे असे मत श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी श्री मकरंद देशमुख यांच्याकडे मांडले त्यावर त्यांनी पर्यटन वाढीसाठी नियोजन करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा