You are currently viewing मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा – जयंत पाटील

मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा – जयंत पाटील

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे, देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा

देवगड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम होत नाही. तोपर्यंत बूथ कमिटी सक्षम होऊ शकत नाही. पक्ष ताकतीने पुन्हा उभा करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बूथ अध्यक्ष महत्त्वाचा असतो. बूथ कमिटी असल्यास मतदारांचे मत परिवर्तन होऊ शकते. असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ते आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना देवगड येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, पुढील महिन्यापर्यंत सर्व कार्यकारणी तयार करा. मी पुन्हा येईन. असे विधान करताच सभागृहात एकच हशा उडाल्या. मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =