You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पी.के डान्स क्रूच्या वतीने अभिवादन..!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पी.के डान्स क्रूच्या वतीने अभिवादन..!

*कुडाळ.पी.के डान्स क्रूच्या विद्यार्थ्यांनकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दणाणून सोडला परिसर*

कुडाळ :

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून,स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आज त्यांची 393 व्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी नगर ह्या ठिकाणी पी.के डान्स क्रू वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करून सर्व विद्यार्थी यांनी अभिवादन केले. त्यावेळी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

त्यावेळी कुडाळ पी.के डान्स क्रू व फिटनेस स्टुडिओ कुडाळ डान्स कोरिओग्राफर सर्वेसर्वा प्रसाद कमतनूरे, सुमन चव्हाण, अंकिता चव्हाण, आदित्य भारद्वाज, रुत्वी चिंदरकर, आर्या फोनडेकर, अर्ध्या बांदेकर, ईशान बांदेकर, कुंजल पवार, कनका परुळेकर, नेपाळी रावले, श्रद्धा सावंत, सारा गांगर्डे पाटील, स्वार नाईक, समीक्षा गवस, उर्वी कुंभार, स्वारा म्हाद्गुत, आर्या म्हाद्गुत, वैष्णवी परब, तेजश्री कुडाळकर, भूमिका कुडाळकर, श्रुष्टी कुडाळकर आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा