You are currently viewing सावित्रीच्या लेकी ….

सावित्रीच्या लेकी ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना*

आम्ही सावित्रीच्या लेकी.. नसानसातून नेकी
वसा घेतो सावित्रीचा … पहा जागर घातला ….

आम्ही शिकून शहाण्या आता झालो ना सजग
काढू अन्याय मोडून…बघा आता लगोलग …
खूप झेलले हो शेण खूप खाल्ली पहा माती
हाती येताच लेखणी गर्वाने ती फुगे छाती
आम्ही सावित्रीच्या लेकी ..

खूप सोसले अन्याय अग्नी परीक्षाही दिल्या
दोन धडुते जोडून फेऱ्या शाळेच्या त्या केल्या
धटिंगणाला सामोरी माय माऊली ती गेली
आम्ही साऱ्याच आहोत पहा तिचीच साऊली
आम्ही सावित्रीच्या लेकी…..

सारी जोखडे फेकून मुक्त झालो आम्ही जरी
तरी फिरते अजून मानेवरती हो सुरी
कुणी कसाई फिरतो एकटीला तो हेरतो
आया बहिणींचे शाप त्यांना पुरून उरतो
तरी सावित्रीच्या लेकी ….

साथ हवी माणसाची पण माणूसच मेला
कुण्या काळतोंड्याने हो,माणूसकीला हो नेला
आम्ही शोधतो माणूस यम घेऊन का गेला?
भाऊ म्हणून पाठीशी कुणी उभा ना राहिला …
आम्ही सावित्रीच्या लेकी …

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − seven =