You are currently viewing भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेत उद्या २९ रोजी महाकर्ज मेळावा

भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेत उद्या २९ रोजी महाकर्ज मेळावा

कणकवली

भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेच्या आवारात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे मार्गदर्शन स्टॉल असणार आहेत . तसेच यावेळी एसबीआय लाईफ, जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीवर मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे.

या मेळाव्याला सर्व नोकरदार, उद्योजक, युवक- युवती, माहिला वर्ग, शेतकरी व ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेशी या संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली शाखा व्यवस्थापकांमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =