You are currently viewing नात्याचं गणित

नात्याचं गणित

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना

नाती जपत आयुष्य सुखात जगावे
का नात्यांकडे उगा आकसाने पहावे !!

शब्द जेव्हा निघतात मुखातून गोड
फिकी पडते त्यांच्यापुढे आंब्याची फोड
का शब्दातील गोडव्याने कडवट बोलावे
का नात्यांकडे उगा आकसाने पहावे

नाती नसतात कधी गरजेसाठी वापरायची
प्रेमाच्या दोऱ्यात नाती मायेने गुंफायची
प्रेम मायेने का बरे नात्यांपासून दूर जावे
का नात्यांकडे उगा आकसाने पहावे

नात्याचं गणित कधीच कठीण नसतं
गुंतावळा झाला की सोडवताना फसतं
बेरीज वजाबाकीला भागाकाराने गुणावे
का नात्यांकडे उगा आकसाने पहावे

नातं असो रक्ताचं वा माणुसकीचं असू दे
गैरसमजाला नात्यात कधीच जागा नसू दे
दूर झालेल्या नात्यांना एकदा कुरवळावे
का नात्यांकडे उगा आकसाने पहावे

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 12 =