You are currently viewing भाजपाच्या वतीने वैभववाडीत शवपेटीचे लोकार्पण

भाजपाच्या वतीने वैभववाडीत शवपेटीचे लोकार्पण

वैभववाडी
वैभववाडी भाजपा कार्यालयास देण्यात आलेल्या वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण सोहळा पक्ष कार्यालयात पार पडला. मुंबई भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेंद्र गावकर, सचिव विजय घरत यांच्याकडून शवपेटी देण्यात आली आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, सरपंच दत्‍ताराम सावंत, निजाम नंदकर, यासीन बटवाले, प्रदीप नारकर, प्रकाश पांचाळ, संताजी रावराणे, नारायण कुसुरकर, अनंत फोंडके आदी उपस्थित होते. यावेळी नासीर काझी यांनी नरेंद्र गावकर व विजय घरत यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा