You are currently viewing ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवनचरित्र व कार्याचे चित्र प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवनचरित्र व कार्याचे चित्र प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली :

 

कणकवली शहर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्र व कार्य याची माहिती देणारे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली शहरातील पेट्रोल पंपासमोरील जागेत हे चित्र प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार नितेश राणे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या चित्रप्रदर्शन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =