You are currently viewing तरंदळे गावातील शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

तरंदळे गावातील शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या नेतूत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते स्वगृही

कणकवली

भाजपा आमदार नितेश राणे यांची कार्यशैली आणि नेतूत्वावर सामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्ते ,पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असतांनाच पूर्वी शिवसेनेत गेलेले सुद्धा भाजपा चे कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतू लागले आहे.

कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह अनेक शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यात काही कार्येकर्ते हे सेनेला सोडून स्वगृही परतले आहेत त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सेना सांभाळू शकत नाही, आम्हाला पक्ष संघटनेत न्याय देत नाहीत असा आरोप भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केली.

शिवसेनेतून भाजपात प्रवेशकर्ते झालेल्या मध्ये माजी सरपंच श्री.राजेश पाठक, ग्राम पंचायत सदस्य श्री.विवेक परब, ग्राम पंचायत सदस्य श्रीमती वैशाली घाडी, संजय परब, निखिल घाडी, शैलेश घाडीगावकर, कालिदास नाईक, विजय घाडीगावकर, सुभाष घाडीगावकर, सुरेश परब, वासुदेव घाडीगावकर, प्रकाश गावकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, विभागीय अध्यक्ष राजू हिर्लेकर, संदीप सावंत आदी उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eleven =