You are currently viewing समीर वानखडे प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा

समीर वानखडे प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा

समीर वानखडे प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा

*शाहरुख खानच्या दबावाखाली समीर वानखडे वर गुन्हा दाखल* :- हिंदू लॉ बोर्ड

मुंबई:-

ED Files Case Against Sameer Wankhede: ईडी ने मुंबई एनसीबी चे पूर्व जोनल डायरेक्टर समीर वानखडे वर गुन्हा दाखल केला आहे सदर हा गुन्हा शाहरुख खान यांच्या मुलावर केलेली कारवाईच्या बदला म्हणून दाखल केला असा आरोप “हिंदू लॉ बोर्ड” चे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार सादर केली.

शाहरुख खान ह्या मुलाला ड्रग्स प्रकरणी वानखडे यांनी गजाआड केले होते याचा राग मनामध्ये ठेवून शाहरुख खान यांनी प्रचंड दबावतंत्र ED वर टाकून वानखडें वर गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले.

सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ रोजी अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मागच्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने एफ.आय.आर. दाखल केला होता. त्याआधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे.

शाहरुख खान यांनी सी.बी.आय. व ईडी वर दबाव टाकण्याकरिता विदेशातून दाऊद माफियाकडून प्रयत्न केले अशा आरोप सेंगर यांनी केला. शाहरुख खानच्या दबावाखाली सीबीआयने ११ मे २०२३ रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे, विश्व विजय सिंह, गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन आणि दोन बाहेरील व्यक्ती किरण गोसावी आणि सॅनविले डिसुजा यांच्यावर शाहरुख खानकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान याची सुटका करण्यासाठी ही लाच मागितली गेली असा (खोटा) आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला होता. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर जर अशी वेळ येत असेल यापुढे कोणी अधिकारी ड्रग माफिया यांच्याविरुद्ध जाणार नाही. म्हणून केंद्र सरकारने समीर वानखडे व इतर अधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची विशेष दखल घेऊन त्यांचे गुन्हे विथड्रो करावे व तसेच शाहरुख खान यांच्या फोनचे रेकॉर्डिंग न्यायालयामध्ये सादर करावे. शाहरुख खान यांच्याकडे प्रचंड असा पैसा असल्यामुळे तो विदेशात पैसा पाठवीत असतो त्यामुळे त्यांच्यावर ईडीने धाड टाकावी जेणेकरून त्यांनी पाठवलेला पैसा हा भारत विरोधी कारवाई करणाऱ्या अतिरेक्यांना तर जात नाही ना ? याची खात्ररजमा करणे फार जरुरी आहे असे सेंगर म्हणाले.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा