सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश हुकलेले आहे, अशा इच्छुक उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी उपलब्ध करुन दिलेली आहे. उमेदवारांनी २६ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत itiadmissions@dvet.gv.in किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेस्थळावर जाऊन अर्ज करावित. असे आवाहन प्राचार्य र.फ.पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी केले आहे.
अर्ज कलेल्या इच्छुक उमेदवारांची गुणवत्ता यादी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी संबंधित संस्थेत लावण्यात येईल. २८ ऑक्टोंबर २०२१ पासून रिक्त राहीलेल्या समुपदेशन प्रवेश फेरी सुरु होईल. समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करुन या प्रवेश फेरीचा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा. औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचा आवश्यक लाभ घ्यावा. अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी, मु. सावंतवाडी (बाहेरचावाडा) ता. सावंतवाडी, दूरध्वनी क्र. ०२३६३ २७२१३६ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३३०४७३५,९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा असे प्राचार्य श्री. पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांवतवाडी यांनी कळविले आहे.