You are currently viewing श्रीलंकेची विजयी सुरुवात

श्रीलंकेची विजयी सुरुवात

सामनावीर चरिथ असलेंका,नईम आणि रहीमची अर्धशतके वाया

टी २० वर्ल्डकपच्या ३ सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला पराभूत केले. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेश च्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात पहिल्या गड्यासाठी ४० धावा जोडल्या. दासने १६ धावा बनवल्या, त्यानंतर आलेला शकीब अल हसन १० धावा बनवून बाद झाला. यष्टिरक्षक मुस्तफिझुर रहीम ने फटकेबाजी करत. सलामीवीर नईम सोबत ७३ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या २० षटकात ४ गडी गमवून १७१ धावा केल्या ल. लंकेतर्फे कुमारा, करुणारत्ने ,बिनुरा फर्नांडो यांनी प्रत्येकी १ गडी बात केला.

धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली.परेरा स्वस्तात १ धावावर बाद झाला.त्यानंतर आलेल्या चरिथ असलंकाने निसंका सोबत ६९ धावांची भागीदारी करत लंकेचा डाव सावरला. निसंका २४ धावांवर बाद झाला.त्यानंतर आलेले फर्नांडो आणि हसरांगा स्वस्तात झाले . पण ६ व्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या भानुका राजपक्सा ३१ चेंडूत ५३ धावांची फटके बाजी करत बांगलादेशच्या हातातून विजय हिसकावून घेतला.असलंका सोबत ८६ धावांची भागीदारी करत विजय संपादन केला. असलंका ने ४९ चेंडूत ८० धावांची तुफानी खेळी केली. बांगलादेश तर्फे हसन आणि अहमद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

या सामन्याच् आकर्षण म्हणजे अष्टपैलू शकीब अल हसनचा टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम २९ सामन्यात ४१ गडी बाद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा