You are currently viewing कोंडये तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय रघुनाथ सावंत यांची बिनविरोध निवड

कोंडये तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय रघुनाथ सावंत यांची बिनविरोध निवड

कणकवली

२१ ऑक्टोबर रोजी कोंडये ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत पुन्हा एकदा संजय सावंत यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संजय सावंत हे तंटामुक्ती अध्यक्षपद अतिशय उत्तम प्रकारे चालवत आहेत. अध्यक्षपदासाठी सावंत यांना ग्रामसभेत रुतुराज तेंडुलकर आणि उपस्थित ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे कार्यतत्परतेमुळे सलग दुसऱ्यांदा संजय सावंत यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आण्णा तेंडुलकर यांनी संजय सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eighteen =