You are currently viewing सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळल्याने स्फोट

सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळल्याने स्फोट

 बोटाला गंभीर दुखापत; अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी

मुलाने आणलेली सुपारी सदृश्य वस्तू सुपारी समजून हाताळत असताना झालेल्या स्फोटात ओटवणे येथील लक्ष्मी सखाराम देवळी यांच्या हाताची बोटे तुटल्याचा खळबळजनक प्रकार दुपारी तीनच्या सुमारास ओटवणे येथे घडला.

दरम्यान तिला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेने सुपारी समजून तो बॉम्ब हाताळला, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या स्फोटात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून एक बोट पुर्णतः निकामी झाले आहे. त्यामुळे तिला प्राथमिक उपचारासाठी नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी सावंतवाडी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + fifteen =