You are currently viewing भारताचा एकतर्फी विजय…

भारताचा एकतर्फी विजय…

ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव,रोहित राहुलची अर्धशतकीय भागीदारी, आश्विनचे २ बळी

दुबई :
ऑस्ट्रेलियाचा भारताने ८ गडी राखून धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . पण ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. ११ धावावर ३ गडी बाद झाले. त्यात आश्विन ने २ गडी, जडेजाने १ गडी बाद केला. त्यानंतर फलंदाजीचा आलेल्या मॅक्सवेल आणि स्मिथ ने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या गड्यांसाठी ६१ धावांची भागीदारी केली राहुल चहरचे मॅक्सवेलला बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा झटका दिला.

मॅक्सवेलने ५ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टॉयनिस ने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १५२ पर्यंत पोहचवली.

स्टॉयनिस ४ चौकार व १ षटकारच्या मदतीने २५ चेंडूत ४१ धावा चोपल्या तर स्मिथने ७ चौकारांच्या मदतीने ४८ चेंडूत ५७ धावांची संयमी खेळी केली त्याला भुवनेश्वर कुमार ने बाद केले.


त्यानंतर १६३धावांचा पाठलाग करताना राहुल आणि रोहितने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. के. एल राहुलने २ चौकार व ३ षटकारच्या मदतीने ३१ चेंडूत ३९ धावा बनवल्या.तर रोहित शर्माने ५ चौकार व ३ षटकारच्या मदतीने ४१ चेंडूत ६० धावा बनवल्या व आपली खेळी निवृत्त्त घोषित केली.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी तुफान फटकेबाजी करत विजय संपादन केला सूर्यकुमार यादवने ५ चौकार आणि १ षटकारच्या मदतीने २७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने १ षटकारच्या मदतीने ८ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या.


या सामन्यात विराट कोहलीची गोलंदाजी आणि पांड्याचा विजयी षटकार आकर्षित ठरला .

धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकात ५ बाद १५२
फलंदाजी
स्टीवन स्मिथ : ५७(४८)
मार्कस स्टॉयनिस : ४१(२५)
गोलंदाजी
आर. आश्विन : २-८
राहुल चहर : १-१७
भारत : १७.५ षटकात २ बाद १५३
फलंदाजी
रोहित शर्मा : ६०(४१)
के. एल.राहुल : ३९(३१)
गोलंदाजी
अष्टोन अगर : १-१४
मिचेल स्टार्क : o-१४

प्रतिक्रिया व्यक्त करा