You are currently viewing कणकवली नगरपंचायत भरविणार 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत “दिवाळी बाजार”

कणकवली नगरपंचायत भरविणार 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत “दिवाळी बाजार”

नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

दिवाळी निमित्त कणकवली न. प. दिवाळी बाजार संकल्पना जाणार आहे. युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग, यांच्या माध्यमातून कुंभार समाजाच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्या, भांडी, मातीचे आकाश कंदील यांचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी होणार आहे. मुबई, गोवा येथे ज्या पद्धतीने बाजार भारतात त्या धर्तीवर हा बाजार असणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात येणारा फराळ, मेणबत्ती, आकाश कंदील हस्तकलेतून साकारणाऱ्या वस्तुंना या बाजारात असणार आहेत. कुंभार समाजा ची पारंपरिक कला असणाऱ्या माती कलेसाठी युथ वेल्फेअर सिंधुदुर्ग यांनी पुढाकार घेतला आहे. कणकवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या गणपती च्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा बाजार भरविण्यात येणार आहे. या बाजारात कुंभार समाजासाठी 15 स्टॉल असणार आहेत. या ठिकाणी लाईट व्यवस्था नगरपचायत मार्फत करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

बचत गटांच्या स्टॉल वर घरगुती फराळ, कागदी आकाश कंदील, आदी घरगुती वस्तू प्रदर्शन व विक्री 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यत हा बाजार असणार आहेत. घरगुती बनविलेल्या दिवाळी साठीच्या वस्तू ची विक्री येथे असणार आहे. याची ज जबाबदारी नगरसेविका मेघा गांगण यांच्यावर देण्यात आली आहे. बचतगटाच्या व कुंभार समाज कला प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन व विक्री असणार 28 रोजी सायंकाळी 5.30 वा या बाजाराचे उघाटन करण्यात येणार आहे. या सर्व विक्रेत्यांची स्टॉल ची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.

कुंभार समाज वस्तू करतात पण त्या मोठ्या शहरात विक्री साठी पाठवतात. त्याला येथे बाजारपेठ या माध्यमातून देण्यात येणार आहे. कुंभार समाज माती कामाचा लाईव्ह डेमो सुद्धा येथे पाहता येणार आहे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी या उद्देशाने हे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक मेघा गांगण, गटनेते संजय कामतेकर, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, किशोर राणे, महेश सावंत, बंडू गांगण, आण्णा कोदे, युथ वेल्फेअर चे सचिव रुपेश घाडी, मनीष सागवेकर, सहसचिव रहुप काझी, विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 5 =