You are currently viewing समानवता ट्रस्ट ने घडविले मानवतेचे दर्शन

समानवता ट्रस्ट ने घडविले मानवतेचे दर्शन

पतीचे छत्र हरपलेल्या निराधार महिलेच्या उदरनिर्वाहाची केली सोय

कणकवली

समाजातील उपेक्षित, गरजू, अनाथ व निराधार व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच हाकेला धावून जाणारे समानवता ट्रस्ट यांनी आपले विधायक कार्य सुरू ठेवत पतीचे छत्र हरपलेल्या निराधार महिलेला मदतीचा हात दिला आहे. संजोग नांदोसकर या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. घरात कोणीही कमवता नाही. मुलांची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली. या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या समानवता परिवाराकडून या महिलेला उद्योग-धंदा देऊन जीवनात उभारी देण्याचा प्रयत्न व आत्मनिर्भरतापूर्वक तिला सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून पीठ व मसाले दळण्याची मशीन देण्यात आली.

तळेरे येथे हा मानवतेचा कार्यक्रम संपन्न झाला. समानवता संस्थेच्या अध्यक्ष सुषमाताई तायशेटे, सचिव कमलेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांच्या उपस्थितीत सदर महिलेला मशीन वाटप करण्यात आले. यावेळी तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश तळेकर व इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा