You are currently viewing अशी ही प्रजा ….

अशी ही प्रजा ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

काही काही माणसे जीवनात अशी येतात
साऱ्या कुटुंबाचेच सुख पहा हिरावून घेतात
धरले तर चावते हो सोडले तर पळते
हतबल होतो माणुस ,त्याला तेच आवडते..

करंगळीच्या बोटावर नाचते घरदार
घरोघर असतोच पहा नग किंवा नार
विचका करून टाकतात हो वेठीला ते धरतात
घरातले सारेच पहा त्यांना हात टेकतात…

वडीलधारे माणसेही सारे सोसत राहतात
कोण काय म्हणेल, म्हणून मूग गिळून बसतात
साकडे पडते वागण्याचे काही कळत नाही
पर्वत करतात कशाचाही नसली जरी राई…

कजाग असतात फार फार कठोरही असतात
त्यांच्यामुळे कितीकांचे संसार पहा नासतात
कुणाचेही भले त्यांच्यामुळे होत नाही
नासवून टाकते संसारच एखादी ती बाई …

म्हणवतो मर्द पण असतो एक गुंड
दात खाणे सदैव असतो त्याचा पिंड
छळ करणे घरातल्यांचा असतो त्याचा छंद
वागण्याला हो त्याच्या नसतो धरबंद …

घरोघरी असे नग जगणे करती दुष्कर
का करतो प्रजा अशी कळे ना परमेश्वर
लीला त्याची अगाध म्हणून द्यावे लागते सोडून
काय मिळते देवा तुला अशी प्रजा घडवून ….?

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =