You are currently viewing दसरा लावणी

दसरा लावणी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची बहारदार लावणी रचना.

अष्टमीला जागर संपलं
म्हणते आता मी गाणं
राया तुम्ही अहो सख्या तुम्ही
दसर्याच लुटा की सोन

आठ दिसाचा उपास सम्पला
अष्टमीला गोंधुळ घातला
सर्वांग गेलं अंबुन देते नक्षत्रांचा देणं
राया तुम्ही अहो सख्या तुम्ही
दसर्याच लुटा की सोन

आताच कुठं सोळावं लागलं
भर ज्वानीन अंग मुसमुसल
तंग अंगावर हिरवी कंचुकी
नक्षत्रांनी सजल लेणं
राया तुम्ही दसर्याच लुटाव सोन

बसा घडी भर या दरबारी
सजली नक्षी मेघ डंबरी
सजवा मैफिल महिरपी दारी
खुलवा चंद्र चांदण
राया तुम्ही दसर्याच लुटा सोन

प्रो डॉ जी आर उर्फ प्रविण जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा