You are currently viewing कणकवली नगरपंचायत च्या विषय समिती सभापती निवड 21 रोजी

कणकवली नगरपंचायत च्या विषय समिती सभापती निवड 21 रोजी

कणकवली

नगरपंचायत च्या विषय समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापती पदाचा निवडणुक कार्यक्रम जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जाहीर केला आहे. या निवडणुक प्रक्रिये करिता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ही विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष पद व निवडणूक कार्यक्रमाचे पीठासन अधिकारी म्हणून कणकवली प्रांताधिकारी यांची जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती केली आहे.

विषय समिती व सभापती निवडीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे. निवडणूक प्रक्रिया करीता ची विशेष सभा पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत सभापतीपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी यांच्या कडे दाखल करायची आहेत. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. छाननी झाल्यानंतर वैध नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

वैध नामनिर्देशन ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर 15 मिनिटांमध्ये उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. व यानंतर विषय समितीच्या सभापती व महिला बालकल्याण समिती उपसभापती पदासाठी मतदान घेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विषय समित्यांच्या सभापती निवडीनंतर स्थायी समिती गठीत करण्यात येणार आहे. या विशेष बैठक व निवडणूक कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =