You are currently viewing अष्टाक्षरी

अष्टाक्षरी

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना*

*अष्टाक्षरी*

*दसरा*

सुख शांती समृद्धीचा
सण हा दसरा मोठा
चिंता क्लेश दूर होता
आनंदाला नाही तोटा

आपट्याची पाने लुटा
सोन्यापेक्षा मान त्याला
राग द्वेष मत्सरही
विसरती त्या क्षणाला

आलिंगन देता सख्या
मनी गहिवर दाटे
पान रुपी सोने तेव्हा
भेट अमूल्य ती वाटे

पूजनात शस्त्रे वही
सीमा उल्लंघन म्हणे
प्रथा घरोघरी असे
हेचि मांगल्याचे लेणे

दसऱ्याचा मुहूर्त हा
कार्यारंभा तो उत्तम
नवे वाहन खरेदी
शुभदिनी सर्वोत्तम

प्रभू श्रीरामांनी केला
अंत रावणाचा खरा
जाळा दैत्य अंतरीचा
मार्ग अध्यात्माचा बरा

©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =