You are currently viewing कालचक्र

कालचक्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग .सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कालचक्र*

**********

संवाद सारा हरवला आता

कुणा कुणासाठी वेळ नाही

धडपड फक्त जगण्यासाठी

जीवाला कुठेच शांती नाही…

 

जन्मदात्यांचे स्पर्श बोलके

ते सुख कधी विसरलो नाही

रुजले बीजांकुर संस्कारांचे

विद्रोह मनास शिवला नाही…

 

आज संवेदनाच निर्जीवी

सहृदयता , उरलीच नाही

अतृप्त , हे श्वास अशाश्वत

दुजे वास्तव जगती नाही…

 

कालचक्र गतिमान अविरत

कुठे थांबावे कळतच नाही

जगव्यवहार स्वार्थात गुंतले

आपुलेपण ते उरलेही नाही…

**********************

*रचना क्र. ६८ / ८ / ७ / २०२३*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =