You are currently viewing सावंतवाडीतील आता व्यायामशाळा, उद्यान सुरू करा – परिमल नाईक

सावंतवाडीतील आता व्यायामशाळा, उद्यान सुरू करा – परिमल नाईक

मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

सावंतवाडी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे व्यायामशाळा, गार्डन, मैदाने, इनडोर गेम्स पूर्ण क्षमतेने खुली करा, अशी मागणी आज माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक परीमल नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे खुली करून बाजारपेठा व दैनंदिन व्यवहार विषयक बहुतांशी निर्बंध उठवले आहेत. त्याच धर्तीवर नगरपरिषदेने शहरातील मैदाने, इनडोअर गेम्स, व्यायाम शाळा, गार्डन पूर्ण क्षमतेने खुली करून शहरातील नागरिकांना सकारात्मक दिलासा द्यावा, अशी मागणी नाईक यांनी निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + ten =