You are currently viewing ‘परुळे विमानतळ ‘अखेर तोंडाला पाने पुसून विमान उडाले…

‘परुळे विमानतळ ‘अखेर तोंडाला पाने पुसून विमान उडाले…

“ते आले आणि भुरकर गेले” कवडीमोलाने ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमीनदारांना साध निमंत्रण नाही- कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग.

मात्र 100 लोकांचा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम म्हणून सांगत आपआपल्या पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांची विनापास उपस्थिती.भर कार्यक्रमात पहायला मीळाली ती दोन्ही पक्षाकडून श्रेयासाठी घोषणाबाजी. विमानतळाचे खरे शिल्पकार कोण हे जनतेला आहे ज्ञात

सिंधुदुर्ग साठी आजचा दिवस अगदी स्वप्नवतच ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ चा लोकार्पण सोहळा पार पडला.. अगदी शाळेत असताना म्हणजे साधारण १९९८-९९ च्य आसपास पहिल्या भूमिपूजन पासून आज ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंतचा विमानतळ बनण्याचा प्रवास पाहतो. राजकारणाच्या श्रेय वादामध्ये विमानतळ होईल न होईल काय माहित अस वाटत असताना आज तो दिवस उजाडला खूप आनंद झाला …

आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ परुळे ‘ गावात विमानतळ होतंय ह्यांचा निश्चितच आनंद आहे. पण ह्या आनंदाला कुठे तरी दुःखाची झालर लागते जेंव्हा भूमिपुत्र म्हणून तुम्हाला अगदीच दुर्लक्षित केलं जात तेंव्हा…. विकास नक्कीच व्हावा , पण तो सर्वसामान्य जनतेला लुटून जोर जबरदस्तीने मुस्कटदाबी करून नक्कीच नसावा. हे ‘ परुळे विमानतळ ‘ ह्याचच उदाहरण… आता गरज आहे ती तेथील जास्तीत जास्त स्थानिकांना या विमानतळ प्रकल्पामध्ये रोजगारासाठी सामावून घेण्याची.

आता सिंधुदुर्ग एअरपोर्ट आपल्या जिल्ह्यात होतोय ह्यात आनंद मानायचा आणि आता सध्या दिवसाला एक विमान उडेल तिथे दिवसाला १०-१५ विमान उडुदे हीच सदिच्छा. पण दररोज ऐवढी विमान आपल्या विमानतळावर येण्यासाठी बेसीक पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनी आपल्यातली श्रेयासाठी ची कटुता बाजूला ठेवून या जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे या चीपी विमानतळापासून जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थान पर्यंत जाणारे रस्ते हे पक्के व मजबुतीकरण झालेले असणे गरजेचे आहे तरच मोठ्या प्रमाणात पर्यटक व उद्योजक आपल्या जिल्ह्यात येतील. नुसताच पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन आज बरीच वर्षे लोटली परंतु जसे गोवा राज्य पर्यटन राज्य असल्याने त्या ठिकाणी वेगळे निकष लावले गेले आहेत त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून गोव्याच्या धर्तीवर तशाच प्रकारचे पर्यटन वाढीसाठी योग्य असेच निकष दोन्ही सत्ताधाऱ्यांनी आपापला श्रेयवाद बाजूला ठेवून लावण्याची गरज आहे.

कदाचित आयुष्यातला पहिला प्रवास बहुतेक ह्याच विमानतळावरून होईल त्या विमानतळवर गेल्यावर मनाला खरच खूप आनंद होईल तो पहिल्या विमान प्रवासाचा नाही तर पुन्हा त्या आपल्या जमिनीवर पाय ठेवल्याचा असेल ज्या माळरानावर बालपणीचे काही अनमोल क्षण घालवले त्याचा आनंद असेल ……ज्यांनी लिहिले सत्य परिस्थिती आहे पुढची येणारी पिढी यातून काय बोध घेईल माहीत नाही पण इतिहास नक्कीच घडवेल…..
गरज आहे ती फक्त दोन्ही सत्ताधाऱ्यांनी या संयमी कोकणी जनतेला प्रामाणीक साथ देण्याची – कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष मनविसे

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + nine =