कुडाळ पंचायत समितीच्या ३ सदस्यांसह शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश
कणकवली
शिवसेनेला भाजपा नेते आणि भजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी जोरदारका झटका दिला आहे.शिवसेनेच्या ३ पंचायत समिती सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.यात पावशी पंचायत समिती सदस्य आणि माजी सभापती राजन जाधव,पाट पंचायत समिती सदस्य डॉ.सुबोध माधव,नेरूर-वालावल पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रभू,यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.या प्रवेशने शिवसेनेला फार मोठा झटका बसला आहे.भजपा युवा नेते विशाल परब हे या प्रवेशा मागील सूत्रधार ठरले असून त्यांनी केलेल्या नियोजनातून शिवसेना पुरती अडचणीत आली आहे.
चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी राणेंवर केलेल्या टीकेचा भाजपाने चांगलाच वचपा काढला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनेला जोरदार धक्का बसला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,युवानेते विशाल परब, बँक संचालक अतुल काळसेकर, कुडाळ सभापती नूतन आहिर,समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर,कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये,कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,पप्या तवटे, रुपेश कानडे, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये, संदीप मेस्त्री, रेखा काणेकर,देवेन सामंत,योगेश घाडी, प्रितेश गुरव,विनोद सावंत,मनोरंजन सावंत,नागेश आईर चंदन कांबळी, अश्विनी गावडे साक्षी सावंत,आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.