You are currently viewing मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या शोकसभेचे 12 ऑक्टोबरला कणकवली येथे आयोजन

मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या शोकसभेचे 12 ऑक्टोबरला कणकवली येथे आयोजन

कणकवली

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांचे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.राजन दाभोलकर यांना श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे करण्यात आलेले आहे.

राजन दाभोलकर यांच्या या अकस्मित जाण्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची उणीव मनसे सोबत जिल्ह्यातील जनतेला जाणवणार आहे. त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग कायम स्मरणात रहाणारा असून एक हक्काचा माणूस आपल्यातून जाण्याने हा फार दुःखद प्रसंग घडलेला आहे. तरी या शोकसभेस नातेवाईक हितचिंतक, मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा