You are currently viewing मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखाचा कोंब्यांचा जत्रोत्सव उत्साहात साजरा

मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखाचा कोंब्यांचा जत्रोत्सव उत्साहात साजरा

हजारो भाविकांनी देवाला कोंबे अर्पण करून केली नवसफेड

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज असंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे,, गोवा, कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर आदी भागातून देखील भाविकांनी या जत्रोत्सवासाठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांनी देवाला कोंबे अर्पण करून आपली नवसफेड केली.
मातोंड-पेंडुर या दोन गावचे श्री देव घोडेमुख देवस्थान हे जागृत देवस्थान असून प्रत्येक भक्तांच्या नवसाला पावणारे देवस्थान आहे. श्री देव घोडेमुख देवाची महती सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात पोचली आहे.
येथील ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव घोडेमुख देवाची महती अफाट आहे. वेंगुर्ला तालुक्यातील जागृत देवस्थान असून उंच डोंगर माथ्यावर बसलेले देवस्थान आहे. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रध्दा आहे. श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या मातीच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास त्या अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्री देव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी गावकर मंडळी देवाच्या तरंगकाठ्यासह घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून आले त्यानंतर श्री देव घोडेमुख क्षेत्रात केळी व नारळाचा नवस दाखविण्यात सुरुवात झाली. त्यानंतर भूतनाथ व पावणाई देवीला तेथे गोडा उपहार दाखविण्यात आला. त्यानंतर डोंगर उतारावरुनच कोंब्याचा बळी देण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. जवळपास २० ते २५ हजार कोंब्याचा बळी जत्रोत्सवात देण्यात आला. सायंकाळी हा बळी देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देव अवसारासह खाली येऊन पुन्हा मंदिराकडे रवाना झाले. या जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासवठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 11 =