You are currently viewing फोंडाघाट-हवेलीनगर रस्त्याचे काम सुरु

फोंडाघाट-हवेलीनगर रस्त्याचे काम सुरु

फोंडाघाट

देवगड-निपाणी राज्य मार्गावरील फोंडाघाट-हवेलीनगर साई मंदिर ते औद्योगिक प्रशिक्षण या मार्गावरील खड्डे चिरा फुटीने न करता डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अजित नाडकर्णी यांनी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बासूतकर यांनी निधीअभावी तात्पुरते खड्डे बुजवण्यात येतील, तरीही यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आज रास्ता रोखो ची प्रशासनाकडुन दखल घेतली गेली. व हवेली नगर रस्ता खडी आणि डांबराने बुजवण्यास सुरुवात झाली.
सार्वजनीक बांधकाम यंत्रणेचे व शाखा अभियंत्यांचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी, जि.प.सदस्य संजय आग्रे, तसेच हवेलीनगर सर्व नागरीकांच्या वतीने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा