You are currently viewing बांद्यात शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांची शोक सभा संपन्न…

बांद्यात शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांची शोक सभा संपन्न…

बांदा

बांदा गावचे सुपुत्र असलेले शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर हे शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जीवनचरित्र हे निस्वार्थी व पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजशील, विचारवंत, साहित्यिक व शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व असलेले तोरसकर यांच्या जाण्याने बांदा व पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. त्यांना अभिप्रेत असलेली समाजशील व कर्तृत्ववान पिढी घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत येथे आयोजित शोकसभेत अनेकांनी व्यक्त केले.
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी कै. प्रतापराव उर्फ आबासाहेब तोरसकर यांच्या शोकसभेचे आयोजन येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आबासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी आबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सरपंच अक्रम खान म्हणाले की, आबासाहेब हे बांद्याचे भूषण होते. शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी व्यक्तिमत्व होते. त्यांचा अभ्यास हा दांडगा होता. जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस म्हणाले की, आबासाहेब हे चालते बोलते ज्ञानपीठ होते. ते अनेकांचे मार्गदर्शक होते. माजी प्राचार्य एम. डी. मोरबाळे म्हणाले की, आबासाहेब हे दातृत्ववान होते. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत केली आहे. आपल्या कोणत्याही निर्णयावर ते ठाम राहायचे. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान म्हणाले की, आबासाहेब हे विचारांची खाण होते. शरद पवार, वाय डी सावंत यांच्यासोबत त्यांचे निकटचे संबंध होते. आव्हाने पेलणारे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 6 =