You are currently viewing गणेश चतुर्थी निमित्त मुंबईवरून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी गाड्यांवर किमान दोन चालक द्यावे – जेडी नाडकर्णी

गणेश चतुर्थी निमित्त मुंबईवरून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी गाड्यांवर किमान दोन चालक द्यावे – जेडी नाडकर्णी

सध्या गणेश चतुर्थी निमित्त अनेक भाविक कोकणाकडे येत असून, एसटीच्या गाड्या प्रत्येक जिल्ह्यांमधून कोकणाच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत, व त्यासाठी जिथे दोन चालकाची ची गरज आहे तिथे ती ड्यूटी फक्त एकाच चालकावर ,तीच ड्युटी जबरदस्तीने लादून चालक तसेच सर्व प्रवाशांचे जीव सध्या धोक्यात घातला जात आहे. एक तर इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या चालकांना सध्या रस्त्याची पूर्णपणे कल्पना नसल्यामुळे व अनेक ठिकाणी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे त्यांना त्याच्या बद्दल कल्पना नाही व अशा परिस्थितीमध्ये एसटी प्रशासन एकच वाहक देऊन सर्वांचा जीव धोक्यात घालत आहे या गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अपघात होण्याची दाट संभावना आहे व तसे झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना गप्प बसणार नसून सदर प्रवाशांचे तसेच वाहकाचे जीव धोक्यात आल्यास व जिविताची हानी झाल्यास त्यांचे सर्व जबाबदारी संबंधित डेपो मॅनेजर व विभाग नियंत्रकाची राहणार आहे याची नोंद घ्यावी .
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी साहेब यांना याची पूर्ण कल्पना दिलेली असून योग्य ती कारवाई यांच्या सूचनेने करण्यात येईल असे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवळे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =