You are currently viewing बीएसएनएल केबलच्या चेंबरला भगदाड

बीएसएनएल केबलच्या चेंबरला भगदाड

सावंतवाडी

शहरातील माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोडवरील बीएएसएन केबलच्या चेंबरला मोठी भगदाड पडली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींंन काही दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेत बीएएसएनएलचे मुख्य प्रबंधक श्री. देशमुख यांना या परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली होती. मात्र, याला १० दिवस उलटल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यानं स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तक्रार करून १० दिवस उलटल्यानंतर देखील बीएसएनएलकडून कोणतीही हालचाल न झाल्यानं माठेवाडावासियांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना जाब विचारत कामचुकार पण करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल केला. तर आपली जबाबदारी सावंतवाडी नगरपरिषदेवर ढकलू पाहणाऱ्या बीएसएनएलला धारेवर धरल. तर उर्मट वर्तणुक करत जबाबदारी फेटाळणाऱ्या सबडिव्हीजन इंजिनिअरला नागरिकांनी हाकलवून लावलं.


दरम्यान, मुख्य प्रबंधक श्री. देशमुख यांना धारेवर धरत तातडीं न उपाययोजना करा, अन्यथा रस्ता बंद करण्याचा इशारा दिला. दरम्यान, दोन दिवसांत येथील सर्व चेंबर, नादुरुस्त पोल दुरुस्त करणार असल्याचा शब्द मुख्य प्रबंधक श्री. देशमुख यांनी दिला.दरम्यान, दोन दिवसांत काम न झाल्यास शांत बसणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला. मुख्य प्रबंधकांनी प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर तंग झालेलं वातावरण शांत झालं. यावेळी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेंमकर, बाळ चोणकर, नंदू गावडे, अमेय मोघे, गणेश गिरी, प्रदीप सुकी, बाप्पा चव्हाण, बंड्या हर्णे, इफ्तिकार राजगुरू, डॉ. लेले आदी माठेवाडा वासिय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 12 =