You are currently viewing माजी जि. प. सदस्य धोंडूशेठ पवार यांचे निधन

माजी जि. प. सदस्य धोंडूशेठ पवार यांचे निधन

वैभववाडी

माजी जिल्हा परिषद सदस्य व तिरवडे तर्फे खारेपाटण गावचे रहिवासी धोंडीराम दत्ताराम पवार वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात ते धोंडूशेठ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाने तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धोंडीराम पवार यांची वैभववाडी तालुक्यात प्रसिद्ध व्यापारी अशी ओळख होती. भुईबावडा येथे ते अनेक वर्षे किराणा दुकान चालवत होते.

त्यांनी तिरवडे गावचे उपसरपंच व व्यापारी मंडळ वैभववाडी तालुक्याचे अध्यक्ष पद भुषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा