You are currently viewing जानवली येथे अपघातात आरोग्यसेवक गंभीर

जानवली येथे अपघातात आरोग्यसेवक गंभीर

धडक देणारा कारचालक पसार

कणकवली

कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी येत असलेले वरवडे आरोग्य केंद्रचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव आणि त्यांच्या मागे दुचाकीवर बसलेल्या आरोग्यसेविका नीलम गवाणकर यांना समोरून येणाऱ्या कारची धडक बसल्याने दोघेजण जखमी झाले. जानवली ग्रामपंचायतच्या दिशेने वळत असताना समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसली. या धडकेत आरोग्यसेवक जाधव आणि आरोग्यसेविका गवाणकर रस्त्यावर फेकल्या गेल्या. बराच वेळ त्या रस्त्यावर पडलेल्या स्थिती असताना याची माहिती मिळतात शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, दामू सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या स्विफ्ट कार मालकाचा पोलिस शोध घेत असून यातील आरोग्य सेवक विजय जाधव यांची यांच्या पायाला जबर मार बसल्याने फॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा