You are currently viewing शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प.अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला

शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प.अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला

नांदगाव उर्दू शाळेस भेट देऊन मुलांशी साधला संवाद

कणकवली :

आजपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून आजच्या शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, महिला व बालविकास सभापती शर्वांणी गावकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव उर्दू शाळेस भेट दिली. शाळेच्या पहिल्या दिवशी ५८ मुलांची उपस्थिती होती. तसेच सर्व शिक्षक वृंद देखील उपस्थित होता. या भेटीत अध्यक्ष यांनी मुलांशी संवाद साधला. यापुढे नियमित शाळेत उपस्थित राहुन शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितली. संजना सावंत यांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी भेटीने भारावून गेल्याचे विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − twelve =