You are currently viewing मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रवेश

मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रवेश

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी सिद्धेश तेंडोलकर, काशिनाथ तेंडोलकर, सुनिता तेंडोलकर, दिलीप राऊळ, जयराम राऊळ, धनंजय मयेकर, गोपाळ जाधव, विलास राऊळ, प्रमोद सामंत, प्रभाकर मळगावकर, सुनिता मेस्त्री, विशाखा रेडकर, समिक्षा ठाकुर, संगिता भांडे, संगिता तेंडोलकर, बाळकृष्ण तेंडोलकर, विजय रेडकर, सिद्धी तेंडोलकर, सखाराम खडपकर, स्वरा तेंडोलकर, विजय खडपकर, उत्तम मेस्त्री, ऋषाली मेस्त्री, संजय मेस्त्री, सिद्धेश भांडे आदींनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत पक्ष प्रवेश केला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल, शैलेश लाड, याकुब शेख, अस्लम खतिब, सोहेल शैख, अजहर खतिब आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा