You are currently viewing १२ व १३ फेब्रुवारीला “चला लेक रिसॉर्ट (कर्जत)” कार्यक्रमाचे आयोजन

१२ व १३ फेब्रुवारीला “चला लेक रिसॉर्ट (कर्जत)” कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई :

 

अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यातर्फे “चला लेक रिसॉर्ट (कर्जत)” या कार्यक्रमाचे १२ व १३ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सौ. मंजुषा प्रसन्ना परब या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. तसेच या प्रसंगी सौ. परब या नवोदित उद्योजकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते मेळावा व उद्योग मार्गदर्शन शिबीर तसेच मोबाईल छायाचित्र स्पर्धा व होळी रंगपंचमी उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाज बांधवांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमानिमित्त नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमात पुरुष, महिला व युवा सहभागी होऊन धमाल, मजा, मस्ती, नाच गाणी यांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 11 =