You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

बांदा

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.
महात्मा गांधीजी याची वेशभूषा मनिष मनोज बांदेकर याने साकारली होती.लाल बहादूर शास्त्री याची वेशभूषा नील नितीन बांदेकर तर संत गाडगेबाबा यांची वेशभूषा गोपाल भिमसेन देसाई याने साकारली होती.
बांदा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या वेशभूषेबद्दल जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ,सरपंच अक्रम खान ,मुख्याध्यापक सरोज नाईक ,ग्रामसेवक देसाई व ग्रामपंचायत सदस्य यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी चैतन्या तळवणेकर,आर्या काळे,दिप्ती धुरी या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बांदा केंद्रशाळेचे शिक्षक व ग्रामपंचारतीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =