जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तिविकास मंच सदस्य प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना
श्रावण आला तुषार घेऊन
सोनकोवळे उन्ह घेऊन
झुला झुलवत इंद्रधनुचा
सप्तरंगाचे क्षितीज घेऊन
यमुना तटी आला गरजत
राधेची पण छेड काढीत
गुलाबदाणी हाती मोगरा
अत्तर दाणी होता शिंपित
श्रावणातील निळमेघ ही
अधरावरी खाली वाकला
धीर सुटला त्या मेघातून
राधेला तो भिजवुन गेला
गंधीत होऊन आला वारा
जुनी सलगी सांगुन गेला
शीर शीरशीर शीळ घालीत
नभी पक्षी तो उडुन गेला
श्रावण आला तुषार घेऊन
गिरी शिखरांना कवेत घेऊन
हिरव्या हिरव्या पाना मधुनी
श्रावणातील आरास घेऊन
प्रो डॉ जी आर (प्रवीण ) जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट
धन्यवाद संवाद मेडिया