You are currently viewing सौ. श्रध्दा दळवी यांचा राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सन्मान

सौ. श्रध्दा दळवी यांचा राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सन्मान

सौ. श्रद्धा दळवी विलवडे गावच्या स्नुशा

मुंबई

भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने विलवडे गावच्या स्नुशा सौ. श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरी बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवन येथे “सन्मानचिन्ह व सन्मानपत्र” देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. श्रध्दा दळवी या सन १९९० सालापासून विविध क्षेत्रामंध्ये विशेषत: करीत असलेल्या समाजकार्य , वैद्यकीय सेवा, साक्षरता, महिला सबलीकरण, स्वच्छता आणि कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने भरीव असे प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्र व बृहन्मुंबई क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी घेऊन सौ दळवी यांचा गौरव केलेला आहे.
सौ श्रदधा दळवी यांना नुकतेच “कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हरसिटी” तर्फे मानद डॉक्टरेट (डी.लिट्) या सन्मानिय पदवी बहाल केल्याबद्दलही माननीय राज्यपाल महोदयांनी श्रीमती दळवी यांचे विशेष अभिनंदन केले.
सौ श्रध्दा दळवी या मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांच्या पत्नी आहेत तर
वेंगुर्ल्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुनंदा ( प्रेमा) रामचंद्र कुबल यांच्या कन्या आहेत. तर विलवडे येथील माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या त्या भावजय आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा