You are currently viewing माथाडी कामगार सेना मुंबई संपर्क प्रमुखपदी शैलेश लोके यांची नियुक्ती

माथाडी कामगार सेना मुंबई संपर्क प्रमुखपदी शैलेश लोके यांची नियुक्ती

देवगड

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान माथाडी कामगार सेना(रजि) या संस्थेच्यावतीने महाराष्ट्र स्वाभिमान माथाडी कामगार सेनेच्या मुंबई संपर्क प्रमुखपदी शैलेश सुनील लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती महाराष्ट्र स्वाभिमान माथाडी कामगार सेना अध्यक्ष प्रशांत सुधाला यांनी केली आहे.

आपल्या शहरातील संघटनेचे काम अत्यंत वेगाने वाढवत योग्य ती बांधणी कराल व माथाडी आणि इतर कामगारांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी योग्य तो निर्णय घ्याल अशी खात्री आम्हाला असल्याने आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान माथाडी कामगार सेनेच्या मुंबई संपर्क प्रमुखपदी आपली नियुक्ती करत आहोत. माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे यावेळी नवनिर्वाचित संपर्क प्रमुख शैलेश लोके यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =