You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला परवानगी..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला परवानगी..

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मागणीला यश

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला शासनाने परवानगी दिली आहे. तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जलक्रीडा पर्यटनाला परवानगी देण्याबाबत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मागणी केली होती. जलक्रीडा पर्यटनास परवानगी दिल्याने उपरकर यांच्या मागणीला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे जलक्रीडा पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात चालते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी जलक्रीडा व्यवसायांसाठी लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. या कर्जातुन अनेक बेरोजगारांनी व्यवसाय सुरु केला आहे. कोरोनामुळे मार्चपासून व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कर्जाचे हप्ते भरणे व जलक्रीडा बोटी व इतर साहित्यांची देखभाल दुरुस्ती करावी लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉटेलमध्ये राहणारे पर्यटक जलक्रीडांसाठी एक ते दोन दिवस थांबतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनातुन मिळणारा महसुल कमी होऊन गोव्यामधील जलक्रीड़ा पर्यटनासाठी सर्व पर्यटक गोव्यामध्ये जात असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होत होता. तसेच महाराष्ट्राचा महसुल कमी होऊन गोवा राज्याचा पर्यटन महसुल वाढत असल्याने राज्याचा पर्यटन व्यवसाय व महसुल वाढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रीडा पर्यटनाला परवाने देणे आवश्यक होते. तसेच याचा फटका पर्यटन व जलक्रीडा पर्यटन व्यावसायिकांना बसत होता. या सर्व गोष्टींचा विचार करून उपरकर यांनी जलक्रीडा पर्यटन सुरू करण्याबाबत मागणी केली होती. या जलक्रीडांच्या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक आहे. तसेच शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =