You are currently viewing खांबाळे हेदीचाटेंब(धनगरवाडी) येथील कैलासवासी समाजबांधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खांबाळे हेदीचाटेंब(धनगरवाडी) येथील कैलासवासी समाजबांधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. सायली जनार्दन बोडेकर यांचा पुढाकार

वैभववाडी

खांबाळे हेदीचाटेंब(धनगरवाडी) येथील गेले काही वर्ष होतकरू, मनमिळाऊ अशा व्यक्तिमत्व असलेले समाज बांधव यांचे निधन झाले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महिला आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष सौ. सायली जनार्दन बोडेकर यांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहभागातून फळझाड प्रजातीचे वृक्ष रोपे लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच सौ.गौरी गणेश पवार,समाजसेवक श्री.गणेश पवार, श्री.बाबाजी देसाई, श्री.रमेश बरगे,श्री.संजय गुरखे तसेच
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे वैभववाडी तालुका अध्यक्ष दाजी बरगे,महिला आघाडी अध्यक्ष सौ.सायली जनार्दन बोडेकर, भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री.प्रकाश देसाई, व सचिव श्री.अनंत देसाई, माजी सैनिक श्री.भोरू बोडेकर,आणि श्री.अंबाजी बोडेकर, विद्यार्थी कुमार वैभव बोडेकर,वेदांत बोडेकर,
कुमारी वल्लिका बोडेकर,हिताक्षी बोडेकर ,इतर ग्रामस्थ श्री.संतोष अडुळकर,सौ.सविता बबन बरगे,श्री. प्रकाश बजू बरगे.
यांच्या सह ज्येष्ठ समाज बांधव श्री.बाबू चिंचू बोडेकर आणि उपस्थित बोडेकर सहपरिवार
मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या कडील बाजूस श्रीमती जनाबाई तानाजी बोडेकर यांचे घरापासून सुरू झालेल्या खडीकरण केलेल्या रस्त्याच्या कडेला सरपंच सौ.पवार यांचे हस्ते श्रीफळ वाढवून आणि फणस रोप लागवड करून त्यानंतर जांभूळ, काजू, सिताफळ,आवळा,बेल, अशा पंचवीस रोपांची लागवड १०० ते १५० मीटर अंतरामध्ये, ग्रामपंचायत नमुना २६ नंबरला नोंद असलेल्या खडीकरण झालेल्या रस्त्यालगत हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ श्री.संतोष अडूळकर यांनी गावच्या सरपंच सौ.गौरी पवार यांच्याकडे हेदीचां टेंब येथील अपूर्ण रस्त्याबाबत खडीकरण करणे आणि डांबरीकरण करून मिळणेबाबत मागणी केली त्यास अनुसरून श्री.जनार्दन बोडेकर यांनी ग्रामपंचायत खांबाळे सरपंच महोदया यांना विशेष सहकार्य करणेबाबत नैसर्गिक न्यायतत्वाची भूमिका मांडली. तसेच ह्या धनगरवाडीच्या बाजूला एक सुंदर नैसर्गिक धबधबा असून त्याठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे.शासनाच्या नवीन धेय्यधोरणानुसार जातीच्या नावाने असणारी धनगरवाडीचे नाव समाजाचे आराध्य दैवत राजे छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या नावाने म्हणजेच (यशवंतवाडी) ठेवण्यात यावी.अशी रास्त मागणी करण्यात आली.अपूर्ण असलेला दळणवळणाचा गंभीर असलेला प्रश्न म्हणजे नियोजित यशवंतवाडी रस्ता त्याचे अपूर्ण असलेले खडीकरण व डांबरीकरण जलदगतीने करण्यात येऊन सदर रस्ता हा जिल्हापरिषद धनगरवाडी शाळेकडे जाणारा जोड रस्ता तेथूनच पुढे जाणारा ग्रामपंचायत खांबाळेकडे जात असलेल्या मुख्य रस्त्याला जोडण्याबाबतचे वरील सर्व प्रश्न जाणून घेऊन अध्यक्षीय भाषणामध्ये गावच्या सरपंच सौ.
गौरी गणेश पवार यांनी वरील सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील व वाडीच्या नामकरणाबाबत विशेष ठराव मंजूर करून ह्या वाडीचे नाव *यशवंतवाडी* नामकरण करून देण्यात येईल,असे आश्वासन उपस्थितांना दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जनार्दन आकाराम बोडेकर यांनी केले. त्याच बरोबर उपस्थितांचे स्वागत तुळशीची रोपे देऊन करण्यात आले.त्याचबरोबर वातावरणात होत असलेले अनियमित बदल, जैविक विविधता टिकविण्यासोबत वृक्षलागवडीचे महत्व हेदीचा टेंब येथील ग्रामस्थांना वृक्षारोपण निमित्ताने महत्व पटवून देण्यात आले.ह्या वृक्षरोपणाकामी
सामजिक वनीकरण विभाग वैभववाडी,यांच्यासह ग्रामस्थ आणि बोडेकर परिवार सह सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. ह्यापूर्वी निधन झालेल्या वाडीतील समाज बांधवांना वृक्षारोपण करून पितृपक्षाच्या पूर्वसंध्येला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =