You are currently viewing थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जयंती निमित्त कुडाळ   एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत कार्यक्रम..

थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जयंती निमित्त कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत कार्यक्रम..

कुडाळ :

थेार संसदपटू बॅ.नाथ पै यांची दिनांक 25/09/2021 रोजी 99 वी जयंती आहे व 2021-22 हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या निमित्त कुडाळ एम.आय.डी.सी येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलनात दुपारी 3 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमास बॅ.नाथ पै यांची नात कु अदिती पै आणि त्यांचे वडील श्री शैलेंद्र पै हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सन्मानणीय अरुण दाभोलकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी नाथ पै प्रेमींनी, *पत्रकार बंधूंनी* सदर कार्यक्रमास उपस्थिती रहावे. असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =