*निरोप बाप्पाला*
येता सण चतुर्थीचा
बाप्पा विराजीतो छान
पूजेमध्ये मिळे त्यास
देवांच्यात खास स्थान
सजतात मंडपीस
फळे फुले उपयुक्त
दर्शनाने गणेशाच्या
नेत्रसुख घेती भक्त
नैवेद्यास रोज असे
गोडधोड काहिवाही
प्रिय असती बाप्पाला
लाडू मोदक ते शाही
दहा दिवस राहूनी
बाप्पा निरोप ते घेती
मन अस्वस्थ होऊनी
डोळे आसवं गाळती
रीती होती मखरेही
घर सुनेसुने वाटे
रिते पाट पाहूनिया
दुःख हृदयी ते दाटे
येती पुढल्या वर्षी या
आशेवर ते भाबडे
बाप्पा येता जाता घाली
दारी रांगोळीचे सडे
©(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६