You are currently viewing गजानना रे !!

गजानना रे !!

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचच्या सदस्या विविध पुरस्कार प्राप्त कवयित्री, लेखिका ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना

एकमेव तूची त्राता
गणनायका रे
सारी निवारी संकटे
विघ्नहर्त्या रे ||

दुःखे सारी लया जावो
सुखदायका रे
मार्ग निष्कंटक होवो
भवतारका रे
गणनायका रे ||

आकांक्षांना पंख मिळो
वरदायका रे
ध्येय मंदिर गाठू दे
बुद्धीदायका रे
गणनायका रे ||

तुझ्या कृपेची कामना
तारणहारा रे
आनंदाचे देई दान
भक्तवत्सला रे
गणनायका रे ||

ध्यास तुझा नित्य मनी
जगत्पालका रे
तव चरणी वास दे
तव बालका रे
गणनायका रे ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा