जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण यांचा अप्रतिम लेख
जरा अंमळ चार वाजता गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे .
तस मी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकलो
आरत्या झाल्या , मंत्रपुष्पांजली झाली . पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या , कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला .
गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या
“यांतु देवा गणांना म सकळ पुर्व मादाय
इच्छित कामना सिद्धर्थ म
पुनरागमनायच ”
अस मंत्र म्हणुन अक्षता श्री मुर्ती वर टाकल्या तस डोळ्यात पाणी आलं , सर्वांचे डोळे ओले झाले , पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्या गत होणार . घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.
मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते . दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं , रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती ,मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल . जगण्याचा एक एक क्षण सोहळा च! शिकवत होता .
बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठी च!! मग तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी , चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ?
तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव . ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीच की म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच !
विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात .
एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो . जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार , जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो
हीच निसर्गाची ख्याती आहे
पान फुल फळ मोहर
काही झाड , याना पण विसर्जित व्हावं लागतच . विविध फुल उमलतात, विविध गंध ते देतात , फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण त्याच अस्तीत्व वयात आलं की कळी ते फुल , फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जन . हीच तर श्रुष्टी चक्र आहे , मग गणपती असो व इतर सजीव !
हो पण गम्मत अशी आहे की ,मन व आत्मा हे अविनाशी , ते परत श्रुष्टी रुपात पुनर्जन्म घेतच की !
गीतेत श्रीकृष्ण म्हणतात
“पुनरपि जननं पुनरपि मरण म ।
पुनरपि जननी जठरे शयनम”।।
याचाच अर्थ ”
इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ”
पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हीच श्रुष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो
विश्व चक्र
असेन मी नसेन मी
सुगंध जतन करेन मी
कोण मी कोण तु ?
फुल मी पान तु
बहरू सदैव चराचरी
निर्माल्य मी निर्माल्य तु
येता ग्रीष्म हा ऋतु
मिसळु चैतन्य नवे
होऊन माती श्रांत तु
थेंब थेंब बरसता
नवं संजीवनी वर्षा ऋतु
फुटून येऊ पानोपानी
फळ मी पान तु
सृजनशील गीत गात
नवजन्माने मग परतु
असेन मी असशील तु
सुगंध कुपी देशील तु
“पुनरागमना यच ”
हाच संदेश आपल्याला बाप्पाकडुन घ्यायचा आहे
अस नाही का वाटत तुम्हाला !
प्रो डॉ जी आर( प्रवीण )जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट
अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर21