You are currently viewing भुताखेतांच्या कथा…

भुताखेतांच्या कथा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

*भुताखेतांच्या कथा…*

(*भाग 22 वा*)

  

हा माझ्याकडे पोस्ट ऑफसेट प्रिंटिंग युनिट मध्ये काम करणारा कमृद्दीन ( बाईंडर ) नावाचा बिहारी कंत्राटदार सुमारे 5 वर्षापासून अव्याहत माझ्याकडे काम करीत होता . त्याची 25 /30 माणसांची टीम होती. ती माणसे बाहेर खोल्या घेवून रहात होती.

हा बंगला माझ्या ताब्यात असल्यामुळे त्या बंगल्यात त्या सर्वांची रहाण्याचीही व्यवस्था झाली , आणि तिथेच एकाच छत्राखाली कामाचीही व्यवस्था झाली. माझेही रु.8000/- दरमाहा वसूल होवू लागले आहेत असे मला वाटले . परंतु 8 दिवसाच्या आतच तो कंत्राटदार माझ्याकड़े आला व मला म्हणाला ” आप्पासाब …

” जगह तो अछ्या है बड़ा है । लेकिन उसमें कुछ तो गड़बड़ है । रातको लोग डरते है । उधर कुछ तो ऐसा एरिया है , जहाँ बहुत तकलीप होती है , रातको उधर कोईभी आदमी रुकता नही .. उस एरियामें रखा हुआ सामान , अगर कोई आदमी सो गया हो तो उसे कोइतो हटाता है , ढकेल देता है । कभी कुछ हसनेकी , रोनेकी , दौडनेकी , भागनेकी आवाज आती है , लोगोंको डर लगता है , शायद कोई औरत वहा उस एरिया में है । किचनके सामनेकी जो रूम और ओ जीना हैं , (स्टेअरकेस ) वहा वो किसीकोभी रातको आने नही देती ..

हमारे आदमी दो दिनसे वहा उस एरियामें काम नही करते .. बाकी जगह काम करते है । लेकिन लोग डर रहे है । …

हे ऐकल्यावर मला सत्यता पटली . वास्तुशास्त्र तज्ञाने सांगितलेले कारण तसेच शेजारी पाजारील लोकांनी सांगितलेल्या गोष्ट यामद्धये तथ्य आहे हे प्रत्ययास आले . नाईलाजाने काही दिवस तेथे कंत्राटदाराने तेथे घेतलेले काम पूर्ण केले. त्यानेही तिथे काम करणे सोडुन दिले.

पुन्हा त्याने बंगला मोकळा करून मला बंगल्याच्या देण्यास आला तेंव्हा..त्या कंत्राटदारालाच मी कुलुप लावायला सांगीतले..

मी त्या वास्तुत परत गेलोच नाही .. वास्तुच्या मालकाला बोलावून घेतले आणी त्याला त्या कंत्राटदाराने घड़लेली सत्य गोष्ट सांगितली. मालकांनीही ती गोष्ट मान्य केली. मी त्यांना म्हणालो मला ती वास्तु नको आहे ..माझे पैसे तुम्ही परत दिले तर आनंद आहे नाही दिले तरी आनंद आहे ..मी तुम्हाला मागणार नाही . कारण व्यवहार जर मी पूर्ण केला असता तर मला व माझ्या कुटुंबाला खुपच नाहक त्रास झाला असता ..असो या तुमच्या बंगल्याच्या चाव्या तुम्ही घ्या .

तो मालक सत्य समजल्यावर पूर्ण ओशाळला ..मला म्हणाला ही गोस्ट तुम्ही कुणाला सांगु नका ..! जर तुम्ही याची वाच्यता केली तर माझी प्रॉपर्टी विकली जाणार नाही ..मी ठीक आहे म्हणालो .. जाते वेळी त्यांनी मला एक सांगीतले मी तुमचे पैसे हळूहळू सवडिने परत देईन ..आणी त्यांनी माझे एक लाख परतही दिले आहेत ..आज ती जागा बिल्डरने घेतली असुन पूर्ण जमीनदोस्त केली असुन तिथे तो स्किम करीत आहे …स्किम झाले नंतर तिथला वास्तुदोष किंवा तिथे असणारा तो अतृप्त आत्मा निघुन जाणार आहे कां ? हे पुढीलनकाळच ठरवेल .

पण या व्यवहारातून आणी अशा शापित बाधित वास्तुपासुन मी मात्र बचावलो..

*यातील निष्कर्ष एवढाच..*

*अशा वास्तू आजही आहेत.*

〰〰〰〰〰〰〰〰

*#©वि.ग.सातपुते.*

( 9766544908 )

 

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 14 =